तुमच्या आधार कार्डवर रजिस्टर सिम कार्ड्स तपासण्याची स्टेप्स

  1. मित्रांनो सर्वात आधी sancharsaathi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. त्यानंतर होम पेजवर खाली स्क्रोल करा आणि Know Your Mobile Connection TAFCOP वर क्लिक करा.
  3. लॉगिन करा: तुमचा मोबाइल नंबर टाका, कॅप्चा कोड टाका, आणि Get OTP वर क्लिक करा. आलेला OTP टाकून Log In करा.
  4. सिम कार्ड्सची यादी पाहा: लॉगिननंतर तुमच्या नावावर रजिस्टर असलेल्या सिम कार्ड्सची यादी दिसेल. नंबरचे पहिले चार आणि शेवटचे चार अंक दिसतील. सगळे नंबर तुमचे असतील तर काही करायची गरज नाही.

अनोळखी नंबरवर काय करायचं?

  • नंबर सिलेक्ट करा: यादीत अनोळखी नंबर दिसल्यास तो निवडा.
  • पर्याय निवडा:
  • Not My Number: नंबर तुमचा नसेल तर हा निवडा.
  • Not Required: नंबर पूर्वी वापरला असेल पण आता हटवायचा असेल तर हा निवडा.
  • Required: नंबर तुम्ही वापरत असाल तर हा निवडा.
  • रिपोर्ट करा: योग्य पर्याय निवडून Report बटणावर क्लिक करा. तुम्हाला Reference Number मिळेल, तो जपून ठेवा.

पुढे काय?

तक्रार नोंदवल्यानंतर ती TRAI आणि टेलिकॉम कंपनीकडे पाठवली जाईल. अनोळखी नंबर बंद होईल. रेफरन्स नंबर सेव्ह ठेवा.

Leave a Comment