लाडकी बहीण ई-केवायसीत येणाऱ्या समस्या आणि सोपे उपाय

नमस्कार मित्रांनो, आज आपण ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या त्या सगळ्या छोट्या-मोठ्या अडचणींवर बोलणार आहोत. ही योजना राज्यभरातील महिलांसाठी खरीच वरदान ठरली आहे, नाही का? आता पर्यंतचे हप्ते खात्यात जमा झाले आहेत, पण पारदर्शकतेसाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी ई-केवायसी करणे आता सक्तीचे झाले आहे. शासनाने याबाबत GR काढला असून, दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मग मित्रांनो, या ई-केवायसीत अनेक बहिणींना समस्या येत आहेत – OTP error पासून ते आधार नंबरच्या गोंधळापर्यंत. चला, एकेक करून समजून घेऊया आणि सोप्या सोल्युशन्स कळवूया. हा लेख शेवटपर्यंत वाचा, तुम्हाला नक्की मदत होईल.

प्रॉब्लेम १: OTP पाठवता येत नाही (Unable to Send OTP)

मित्रांनो, ई-केवायसी सुरू करताच सर्वात मोठा त्रास म्हणजे ‘Unable to Send OTP’ असा error येणे. पोर्टलवर एकदम सगळे येतात, त्यामुळे सर्व्हरवर लोड पडतो आणि OTP येतच नाही. ही गोष्ट खूपच निराशाजनक आहे, विशेषतः जेव्हा घाईत असता तेव्हा.

सोल्युशन: मित्रांनो, यावर सोपा उपाय म्हणजे रात्री उशिरा, म्हणजे ११-१२ वाजता प्रयत्न करा. तेव्हा ट्रॅफिक कमी असते. किंवा काही दिवस थांबून परत प्रयत्न करा. असं केलं तर नक्कीच काम होईल.

प्रॉब्लेम २: जून-जुलै-ऑगस्टचे पैसे अजून आले नाहीत

बहिणींनो, बऱ्याच जणांना जून, जुलै आणि ऑगस्टचे हप्ते अजून मिळाले नाहीत, आणि मनात प्रश्न उभा राहतो – हे पैसे मिळतील का? ही चिंता सगळ्यांना आहे, आणि ती योग्यच आहे.

सोल्युशन: मित्रांनो, यासाठीच तर ई-केवायसीची गरज आहे. प्रक्रिया पूर्ण झाली की, पात्रतेची तपासणी होईल आणि सर्व पैसे एकरकमी मिळतील. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे स्पष्टच सांगितले आहे. फक्त ई-केवायसी करा, बाकी सगळं नीट होईल.

प्रॉब्लेम ३: आधार नंबर पात्र यादीत नाही

ई-केवायसीत आधार नंबर टाकला की ‘सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही’ असा error येतो. याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात आणि योजनेतून वगळले गेलात, असं वाटतं. हे ऐकून मन खराब होते, पण मित्रांनो, हे काही शेवट नाही.

सोल्युशन: यात काही उपाय नाही, कारण हे घरातील परिस्थितीवर अवलंबून असते. जर घरी ITR भरणारा कोणी असेल, चारचाकी गाडी असेल किंवा दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत असेल, तर असा error येऊ शकतो. फक्त परिस्थिती तपासा आणि आवश्यकता असल्यास शासनाकडे अपील करा.

प्रॉब्लेम ४: वडील किंवा पती नाहीत तर?

मित्रांनो, ई-केवायसीत वडील किंवा पतीचा आधार नंबर मागितला जातो, पण ज्यांना दोघेही नाहीत त्यांच्यासाठी काय? हा प्रश्न खूप जणांना पडला आहे, आणि तो अतिशय संवेदनशील आहे.

सोल्युशन: सध्या शासनाकडून यावर दुसरा पर्याय दिलेला नाही. थोडे दिवस थांबा. जेव्हा अपडेट येईल, तेव्हा आम्ही तुम्हाला लगेच कळवू. फक्त धीर धरा, मित्रांनो.

प्रॉब्लेम ५: वडील आणि पती दोघे असतील तर कोणाचा आधार?

बहिणींनो, जर वडील आणि पती दोघेही असतील तर नेमका कोणाचा आधार नंबर टाकायचा? हा गोंधळ खूप सामान्य आहे, आणि चुकीचा टाकला तर पुन्हा सुरुवात करावी लागते.

सोल्युशन: सोपं आहे मित्रांनो – तुमच्या आधार कार्डवर ज्याचं नाव असेल, त्याचा नंबर टाका. म्हणजे जर आधारवर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा, आणि पतीचं नाव असेल तर पतीचा. असं केलं तर काही अडचण येणार नाही.

प्रॉब्लेम ६: निवृत्ती वेतन ऑप्शन – होय की नाही?

ई-केवायसीत ‘निवृत्ती वेतन’साठी होय किंवा नाही असा पर्याय येतो. यात नेमकं काय निवडायचं, याबाबत सगळीकडे चर्चा आहे.

सोल्युशन: मित्रांनो, आम्हाला वाटतं होय किंवा नाही काहीही निवडलं तरी फारसा फरक पडणार नाही. कारण आधार नंबरवरूनच सरकारी कर्मचारी आहेत की नाही हे कळेल. तरीही बदल झाला तर आम्ही कळवू.

प्रॉब्लेम ७: घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला

डिक्लेरेशनमध्ये ‘घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला’ असा पर्याय येतो, तिथे होय की नाही? हा प्रश्नही बरेचदा विचारला जातो.

सोल्युशन: मित्रांनो, जर घरात नेमके एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर ‘होय’ सिलेक्ट करा. दोनपेक्षा जास्त असतील तर ‘नाही’. पण ‘नाही’ टाकलं तर अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकच असेल तर नेहमी ‘होय’च निवडा.

इतर सामान्य प्रश्न

ई-केवायसीची शेवटची तारीख काय? मित्रांनो, दोन महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे घाई करू नका पण वेळेवर पूर्ण करा.

लाडकी बहीण योजना बंद करायची असेल तर? तर ई-केवायसी करूच नका, म्हणजे लाभ बंद होईल. हा एकमेव पर्याय आहे.

Leave a Comment