महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांसाठी खरंच एकदम आनंदाची बातमी आहे. आता नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करताना पैसे देण्याची गरजच उरली नाही. शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून हा मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वी नोंदणीला थोडे शुल्क लागायचे, पण आता ते पूर्णपणे मोफत झाले आहे. यामुळे कामगारांना आर्थिक भार कमी होऊन योजना लाभ घेणे सोपे झाले आहे.
नवीन नोंदणी ऑनलाइन कशी कराल?
आता घरबसल्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून नवीन नोंदणी करणे खूपच सोपे झाले आहे. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाची अधिकृत वेबसाइट वर जा. तिथे ‘Workers Registration’ किंवा ‘नोंदणी’ सेक्शनमध्ये क्लिक करा.सर्वप्रथम पात्रता तपासा – वय १८ ते ६० वर्षे असावे, गेल्या १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकामावर काम केलेले असावे.
ATM मधून पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्ड नको, UPI पुरेसा – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 👈
हे पूर्ण झाले तर ‘Proceed to Form’ वर क्लिक करा. आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर टाका, OTP येईल. त्यानंतर फॉर्ममध्ये नाव, पत्ता, कामाचा प्रकार, बँक डिटेल्स अशी माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा – आधार कार्ड, ९० दिवस कामाचा प्रमाणपत्र (हे नवीन फॉरमॅटमध्ये वेबसाइटवरून डाउनलोड करून घ्या), फोटो आणि बँक पासबुकची कॉपी. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पावती मिळेल. ती डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा. पेमेंटची कुठलीही गरज नाही
बांधकाम कामगार योजना 2025: कामगारांसाठी लाभदायी संधी 👈
नूतनीकरणाची प्रक्रिया कशी आहे?
ज्यांची आधी नोंदणी आहे त्यांच्यासाठी नूतनीकरण (Renewal) ही प्रक्रिया आणखी सोपी आहे. त्याच वेबसाइटवर ‘Renewal’ सेक्शनमध्ये जा. जुना नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका, जो MH ने सुरू होतो.
OTP वरून लॉगिन करा.चालू वर्षातील ९० दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र अपलोड करा. इतर डिटेल्स अपडेट करा आणि सबमिट करा. लगेच पावती जनरेट होईल, जी डाउनलोड करा. यातही कोणतेही पेमेंट नाही. नूतनीकरण केल्याशिवाय योजना लाभ मिळत नाहीत, म्हणून वेळेत करून घ्या.
महिलांना या योजनेतून मिळणार मोफत शिलाई मशीन आणि व्यवसायासाठी कर्ज 👈
या मोफत नोंदणीचे फायदे काय?
नोंदणी केल्यानंतर कामगारांना अनेक योजना उपलब्ध होतात. उदाहरणार्थ –
- मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत
- अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मदत
- शिक्षणासाठी स्कॉलरशिप
- घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी अनुदान
- आरोग्य विमा आणि उपचारासाठी सहाय्य
हे सगळे लाभ मिळवण्यासाठी नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. आता पेमेंट नाही म्हणजे कोणीही कामगार मागे राहणार नाही. विशेषतः ग्रामीण भागातील आणि स्थलांतरित कामगारांसाठी ही सुविधा खूप उपयुक्त ठरेल.
घरबसल्या मोबाईलवरून दररोज ₹600 कमवा – 2025 मधील 5 Earn Money Apps 👈
काही टिप्स आणि सावधानता
- नेहमी अधिकृत वेबसाइट वापरा.
- फेक साइट्सवर फसू नका.
- ९० दिवस कामाचा प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून घ्या किंवा वेबसाइटवरून नवीन फॉर्मेट डाउनलोड करा.
- अर्ज करताना मोबाईल नंबर सक्रिय ठेवा, OTP साठी गरज पडते.
- काही अडचण आली तर जवळच्या तालुका लेबर ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जा.
आता बांधकाम कामगारांसाठी Online Registration आणि Renewal इतके सोपे झाले आहे की, कोणालाही अडचण येणार नाही. ज्यांनी अजून नोंदणी केली नाही किंवा नूतनीकरण करायचे आहे, त्यांनी लगेच सुरुवात करा. ही आनंदाची बातमी खरंच कामगारांच्या हक्कांची पूर्तता करणारी आहे. तुमच्या मेहनतीला योग्य मान मिळावा, हीच अपेक्षा
ऑनलाईन नोंदणी कशी करावी ?
- शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत mahabocw.in या वेबसाईटला भेट द्या.
- महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाची वेबसाईट उघडल्यानंतर त्याठिकाणी ‘बांधकाम कामगार नोंदणी’ नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमचा जिल्हा, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती टाकून घ्या. तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवण्यात येईल.
- त्यानंतर एक अर्ज किंवा फॉर्म तुमच्यासमोर दिसेल त्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, तुमचा पत्ता, जन्मतारीख, बँकेची माहिती इत्यादी व्यवस्थित भरून घ्या.
- वरील विचारण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांना योग्य स्कॅन करून अपलोड करा.
- सर्व माहिती भरून झाल्यावर व कागदपत्र व्यवस्थित अपलोड केल्यावर Submit किंवा अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा.
- तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला गेल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ती पावती डाऊनलोड करून प्रिंट काढून ठेवा.
नूतनीकरण (Renewal) कसे करावे ?
नूतनीकरणाचे प्रक्रिया एकदम सोपी आहे यासाठी बांधकाम कामगारांना फक्त चालू वर्षातील 90 दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र व नोंदणी केलेला जुना नोंदणी क्रमांक लागेल.
- नूतनीकरणासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत mahabocw.in या वेबसाईटवर जावा.
- त्यानंतर बांधकाम कामगार नूतनीकरण या पर्यायावर क्लिक करा, त्याठिकाणी तुमचा जुना नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
- तुमची जुनी माहिती त्याठिकाणी दाखवली जाईल त्यामध्ये काही बदल करायचा असेल, तर तुम्ही तो त्याठिकाणी करू शकता.
- आता पुढील स्टेपमध्ये नवीन 90 दिवसाच्या कामाचा प्रमाणपत्र अपलोड करा, त्यानंतर अर्ज सादर करा.
- लगेच नूतनीकरणाची पावती मिळवण्यासाठी तुमच्या आधार लिंक मोबाइलवरती ओटीपी पाठवण्यात येईल.
- तो ओटीपी त्याठिकाणी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करा.
- तुमचा अर्ज नूतनीकरण झालेला असेल व संबंधित नूतनीकरणाची पावती डाऊनलोड करून भविष्यकाळातील कामासाठी प्रिंट काढून ठेवा.
शासनाकडून बांधकाम कामगार योजनेमध्ये योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे या सरकारी योजनांचा लाभ घेणे आता एकदम सोपं झालं आहे.
घरबसल्या तुम्ही मोबाईलवरच बांधकाम कामगार योजने संदर्भातील संपूर्ण बाबींचा लाभ घेऊ शकता. यासाठी बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट नक्की चेक करा.




