पूर्वी निकाल जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयात धाव घ्यावी लागायची किंवा टीव्हीवर तासन्तास वाट पाहावी लागायची. पण आता State Election Commissionच्या अधिकृत वेबसाइटवर एका क्लिकवर सगळी माहिती मिळते.
सर्वप्रथम https://sec.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. ही साइट मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांत उपलब्ध आहे, त्यामुळे कोणालाही सोपी जाते.
रेशन कार्ड क्रमांकाने डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करा: सोप्या स्टेप्स जाणून घ्या! 👈
मेनूमध्ये ‘निवडणूक निकाल’ किंवा ‘Results’ हा पर्याय निवडा. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे विभाग दिसतील.
तिथे तुम्ही जिल्हा परिषद (ZP) किंवा पंचायत समिती (PS) असा प्रकार निवडा. जिल्हा स्तरावरील गटांचा निकाल हवा असेल तर ZP, तर तालुका स्तरावरील गणांचा हवा असेल तर PS.
मोफत भांडी योजना अर्ज पुन्हा सुरू, असा करा अर्ज 👈
नंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि निवडणुकीचे वर्ष (उदा. २०२६) निवडा. सगळे तपशील अचूक भरून ‘Search’ किंवा ‘View’ बटन दाबा. लगेच तुमच्या भागातील उमेदवारांची आघाडी, विजयी उमेदवार आणि पक्षनिहाय आकडेवारी समोर येईल.
मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी True Voter ॲप
आणखी सोयीस्कर हवं तर राज्य निवडणूक आयोगाने आणलेलं True Voter हे मोबाईल ॲप वापरा. प्ले स्टोअरवरून फ्री डाउनलोड करा.
250 रूपयात ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या कसं काढायचं – संपूर्ण प्रक्रिया 👈
ॲप उघडून ‘Election Result’ विभागात जा. तिथे तुमच्या मतदारसंघाची माहिती थेट मिळेल – कोण आघाडीवर आहे, कोणी विजय मिळवला, हे लाइव्ह अपडेट्ससह दिसेल. हे ॲप मतदार यादी तपासणे, मतदान केंद्र शोधणे यासाठीही उपयुक्त आहे.
मित्रांनो, या डिजिटल सुविधांमुळे निवडणूक प्रक्रियेत transparency खूप वाढलीय. आता अफवा पसरवण्याची किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्याची गरजच उरलेली नाही. तुम्ही घरी बसून, मोबाईल किंवा लॅपटॉपवरून अचूक आणि ताज्या आकडेवारी पाहू शकता. आजच्या या निकालांमुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची दिशा ठरेल, त्यामुळे सर्वांनीच लक्ष ठेवा.
कोणाचेही व्हॉटसॲप स्टेटस सहज डाउनलोड करण्याची सोपी पद्धत WhatsApp Status Download 👈
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक निकाल 2026 | ठळक निकाल
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून विविध जिल्ह्यांत वेगवेगळ्या पक्षांना यश मिळाले आहे. काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून काही जिल्ह्यांत जुने राजकीय वर्चस्व कायम राहिले आहे.
जिल्हानिहाय महत्त्वाचे निकाल
सांगली जिल्हा परिषद
- पलूस–कुंडल गटातून काँग्रेसचे ऋषीकेश लाड विजयी
- भाळवणी–विटा येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या डॉ. शीतल बाबर आघाडीवर
- मेंदू – भाजपच्या हर्षदा महाडिक आघाडीवर
- म्हैसाळ – राष्ट्रवादी (शरद पवार गट) सचिन कांबळे आघाडीवर
सोलापूर जिल्हा परिषद
- अकलुज तालुक्यात अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव
- सांगोला तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे दादासाहेब लवटे विजयी
- माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी
- उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर पराभूत
रायगड जिल्हा परिषद
- उरण तालुक्यात ठाकरे गटाचा विजय
- जिल्हा परिषद: प्रेरणा पाटील विजयी
- पंचायत समिती: परेश ठाकूर, दीपक भोईर विजयी
- वावंजे गटातून भाजपच्या कमला देशेकर विजयी
- म्हसळा पाभरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल बसवत विजयी
- शहापूर गटातून अजित पवार गटाचे अमित नाईक विजयी
रत्नागिरी जिल्हा परिषद
- १० पैकी ८ जागांवर शिंदे गटाची शिवसेना आघाडीवर
- पावस गटात महेंद्र मांडवकर आघाडीवर
- निरुळ गोळप – उदय बने (अपक्ष) आघाडीवर
- हातखंबा – परशुराम कदम (अपक्ष) आघाडीवर
कोल्हापूर जिल्हा परिषद
- काँग्रेसची जोरदार कामगिरी
- आमदार विनय कोरे यांना मोठा धक्का
- मुंडशिंगी गटातून भाजपचे तानाजी पाटील आघाडीवर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद
- कणकवली तालुक्यात तळेरे गटातून भाजपचे राजेश जाधव विजयी
- काँग्रेसचे प्रवीण वरूणकर पराभूत
- खारेपाटण गणात भाजपच्या प्राची इस्वलकर बिनविरोध विजयी
लातूर जिल्हा परिषद
- पानगाव गणात मनसेचा उमेदवार आघाडीवर
परभणी जिल्हा परिषद
- पहिला कल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने
- दुसरा कल ठाकरे गटाच्या बाजूने
निष्कर्ष
मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकाल 2026 मध्ये राज्यभरात चुरशीच्या लढती, सत्ता बदलाचे संकेत आणि काही ठिकाणी जुने वर्चस्व कायम असल्याचे चित्र दिसून आले आहे. अंतिम जागावाटप स्पष्ट झाल्यानंतर जिल्हानिहाय सत्तासमीकरण ठरणार आहे.




