Aadhaar Card Address Change Online 2026 : आधार कार्डवरील पत्ता ऑनलाइन बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया

नवीन वर्षात नवीन घर, नवीन शहर किंवा फक्त पत्त्यात थोडीशी चूक? Aadhaar Card Address Change Online हे काम आता इतकं सोपं झालंय की घराबाहेर पाऊल टाकायची गरजच नाही. २०२६ मध्ये UIDAI ने ऑनलाइन सुविधा आणखी सुधारलीय. विशेष म्हणजे online address update साठी १४ जुलै २०२६ पर्यंत पूर्णपणे free आहे! म्हणजे घर बसल्या, मोबाईलवर OTP घेऊन, काही क्लिक्समध्ये तुमचा पत्ता बदलता येतो. चला, स्टेप बाय स्टेप समजून घेऊया ही प्रक्रिया.

ऑनलाइन पत्ता बदलण्यासाठी काय लागेल?

सगळ्यात आधी हे सगळं हाताशी असावं लागेल:

  • तुमचा registered mobile number आधारशी लिंक असावा (OTP येण्यासाठी आवश्यक)
  • वैध Proof of Address (POA) डॉक्युमेंट – उदा. पासपोर्ट, वोटर आयडी, रेशन कार्ड, बँक स्टेटमेंट, इलेक्ट्रिसिटी बिल
  • (३ महिन्यांपेक्षा जुना नसावा), रेंट अ‍ॅग्रीमेंट, प्रॉपर्टी टॅक्स रिसीप्ट इ.
  • इंटरनेट कनेक्शन असलेला मोबाईल किंवा लॅपटॉप

जर तुमच्याकडे स्वतःचा POA नसेल तर Head of Family (HoF) आधारद्वारेही पत्ता अपडेट करता येतो. हे खूप उपयुक्त आहे मुलांना, पत्नीला किंवा आई-वडिलांना.

स्टेप बाय स्टेप ऑनलाइन प्रक्रिया

  • १. सर्वप्रथम myAadhaar portal वर जा – (UIDAI ची ऑफिशियल साइट, फेक वेबसाइट्सपासून सावध रहा!)
  • २. Document Update किंवा Update Address ऑप्शन निवडा.
  • ३. तुमचा 12-digit Aadhaar number टाका, कॅप्चा भरून Send OTP वर क्लिक करा.
  • ४. रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन व्हा.
  • 5.POA document अपलोड करा (स्कॅन किंवा क्लियर फोटो PDF/JPG मध्ये).
  • 6. सर्व डिटेल्स तपासून Submit करा.
  • 7. यशस्वी झाल्यास SRN (Service Request Number) स्क्रीनवर दिसेल आणि SMS नेही येईल. हा नंबर सुरक्षित ठेवा

प्रक्रिया पूर्ण झाली! आता फक्त वाट पाहायची. सामान्यतः ३० दिवसांत अपडेट होते, पण कधी कधी ९० दिवसांपर्यंत लागू शकतात.

अपडेट स्टेटस कसं चेक कराल?

  • पुन्हा myAadhaar पोर्टलवर जा
  • Check Aadhaar Update Status ऑप्शन निवडा
  • SRN आणि आधार नंबर टाका
  • स्टेटस लगेच दिसेल – Pending, In Process, Approved किंवा Rejected

जर अपडेट झालं तर तुम्ही e-Aadhaar डाउनलोड करू शकता. नवीन पत्ता तिथे दिसेल

काही महत्त्वाच्या टीप्स

  1. फक्त पत्ता बदलण्यासाठी ऑनलाइन फ्री आहे (जुलै २०२६ पर्यंत), पण नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार केंद्रावर जावं लागेल आणि थोडं शुल्कही लागू शकतं.
  2. डॉक्युमेंट क्लियर आणि वैध असावेत, नाहीतर रिजेक्ट होईल.
  3. Head of Family ऑप्शन वापरताना HoF ला ३० दिवसांत कन्फर्म करावं लागतं, नाहीतर रिक्वेस्ट कॅन्सल होते.
  4. नेहमी ऑफिशियल UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar अ‍ॅप वापरा.

आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी आधार लागतो – बँक, सिम, PAN लिंकिंग, शिष्यवृत्ती, सबसिडी सगळीकडे. म्हणूनच Aadhaar Card Address Change हे काम लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे.

घर बसल्या हे करून झालं तर मग कशाला उशीर करायचा?फक्त काही मिनिटं द्या आणि तुमचा पत्ता अपडेट करा. गरज पडली तर १९४७ वर कॉल करूनही मदत मिळू शकते. सगळं सोपं आहे, फक्त सुरू करा!

आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी आवश्यक अटी

  • आधार कार्डमध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
  • आधारशी मोबाइल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे
  • OTP शिवाय लॉगिन करता येत नाही
  • ऑनलाइन शुल्क 50 रुपये आहे
  • वैध Address Proof Document अपलोड करणे आवश्यक आहे

Aadhaar Card Address Change Online 2026 करण्याचे फायदेआधार केंद्रात रांगेत उभे राहावे लागत नाहीघरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येतोकमी शुल्कात सेवा उपलब्धस्टेटस ऑनलाइन ट्रॅक करता येतोअपडेट झाल्यानंतर ई-आधार त्वरित डाउनलोड करता येतो

Leave a Comment