मित्रांनो, नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. पण स्थानिक पातळीवरील विरोध आणि जनतेच्या भावनांचा आदर करत राज्य सरकारने या मार्गाच्या संरेखनात (Alignment) बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषत: सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून जाणाऱ्या मार्गात काही बदल होणार असून, यामुळे या भागातील संपर्क सुविधा आणि पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल. चला तर मग, या बदलांबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीबाबत थोडक्यात जाणून घेऊया.
शक्तिपीठ मार्गाचा नवा आराखडा
नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत महत्त्वाची माहिती दिली. मित्रांनो, हा प्रकल्प धार्मिक पर्यटन आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग नागपूर ते गोवा असा असून, यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांचा संपर्क अधिक सुकर होणार आहे. पण काही ठिकाणी, विशेषत: धाराशिव परिसरात स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला. हा विरोध लक्षात घेऊन सरकारने मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा मार्ग सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून जाणार आहे, ज्यामुळे या भागातील गावांना थेट फायदा होईल.
रोजगार हमी योजना जॉब कार्ड 2025: eKYC शिवाय पैसे बंद! जाणून घ्या सोप्या स्टेप्स 👈
शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर
मुख्यमंत्र्यांनी यावेळी एक उदाहरण दिले. चंदगड येथे एका आमदाराच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० शेतकऱ्यांनी मोर्चा काढून मार्ग त्यांच्या भागातून नेण्याची मागणी केली होती. यावरून स्थानिकांचा उत्साह दिसून येतो, असे फडणवीस म्हणाले. मित्रांनो, सरकारचा उद्देश कोणावरही अन्याय करणे नाही. उलट, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि पर्याय देण्याचे धोरण आहे. यापूर्वी पुणे विमानतळाच्या भूसंपादनावेळीही सुरुवातीला विरोध झाला होता. पण योग्य मोबदला मिळाल्यावर ९५ टक्के जमीन सहमतीने मिळाली, तर फक्त ५ टक्के प्रकरणे कौटुंबिक कारणांमुळे अडकली. यावरून सरकारची पारदर्शकता आणि लोकांप्रती संवेदनशीलता दिसून येते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विरोध प्रामुख्याने धाराशिव परिसरापुरताच मर्यादित आहे. काही राजकीय नेत्यांनी याचा गैरसमज पसरवून आंदोलन रेटण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, सरकारने यावर तोडगा काढला आहे. नवे संरेखन सोलापूर आणि सांगलीतून जाणार असून, यामुळे या जिल्ह्यांना शक्तिपीठाशी थेट जोडले जाईल. यामुळे स्थानिकांना रोजगार, व्यापार आणि पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
कमी सिबिल स्कोर असतानाही शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे | Education loan with low CIBIL score 👈
नव्या मार्गातील गावांची यादी
नव्या संरेखनानुसार खालील गावांमधून मार्ग जाण्याची शक्यता आहे:
- सोलापूर जिल्हा: पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला
- सांगली जिल्हा: मिरज, तासगाव, जत
- कोल्हापूर जिल्हा: चंदगड, कागल
ही यादी प्राथमिक आहे आणि अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाईल. मित्रांनो, या बदलांमुळे स्थानिकांना फायदा होईल आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल. शक्तिपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नाही, तर विकासाचा आणि समृद्धीचा मार्ग आहे.
लाडक्या भावांना Instant Loan च्या Income Proof शिवाय मिळणार 25 हजार रुपये! NO CIBIL ₹25000 New Loan App: Fast Approval.. 👈
जुन्या आराखड्यानुसार शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची संपूर्ण यादी:
विदर्भ-
1) यवतमाळ जिल्हा –
चिल्ली ,सुकली ,नागेशवाडी,दहागाव,बेलखेड ,आमला,येरद,घोडदरा ,चिंचघाट ,चापडोह ,येवली,वडगाव ,रामनगर ,कोरेगाव ,वरूद,येवती ,
,केळझरा,अंतरंगाव ,सुकली ,लोणबेहल ,घोणसरा,हिवाळेश्वर ,बोरगाव , तळणी , कुर्हा ,अंजी , कारेगाव ,बोरगाव ,पिंप्री,विठोली ,यर्माल , पिंपळदरी ,तिवरंग ,मलकापूर ,पोहंडूळ ,इंजनि,हिवरा ,गौळ,कुरवाडी ,डोंगरगाव ,वरझडी ,खैरगाव , मांजरंडा , खडका,वाघनाथ,आंबोडे , कलगाव, उटी , नेहरूनगर ,मुडना,कोठारी , राजुरी ,नंदगव्हाण .
2)वर्धा जिल्हा –
वाढोणाखु ,पोफळणी ,शरद,देवळी ,इसापूर ,काजळसरा ,वाटखेडा ,बाभुळगाव ,खर्डा ,पठेगाव,चिकणी ,दिग्रस ,पांढरकवडा ,गणेशपूर , झाडगाव ,तीगाव ,रोठा ,धोत्रा ,निमगाव,सैदापूर ,कर्मलापूर,वाबगाव,काशीमपूर,बोरी महल,रासा , जोंधळणी,मलकापूर,कळंब , दत्तपूर , हिरडी , गांढा , वंडली,महितापुर,गलमगाव,सोनेगाव , सोनखास ,मावळनी,सिंगनापूर
मोफत पिठाची गिरणी योजना: अर्ज आणि इतर माहिती 👈
मराठवाडा –
1)नांदेड जिल्हा –
करोडी,कालेश्वर,वेलांब,ऊचेंगाव, आडा,रुई ,पळसा,बरड शेवाळा,कवणा , बामणी ,बामणीतांडा,चिंचगव्हाण ,जगापुर ,मनाठा,वरवंट,जांभळं सावली , भोगावं
2)हिंगोली जिल्हा –
गिरगाव ,उंबरी ,मालेगाव ,धमदारी ,देगाव कुर्हाडा ,पळसगाव ,गुंज ,आसेगाव ,टाकलगाव ,राजापूर ,बाभुळगाव ,पिंपचौरे ,रेणुकापूर ,लोणीबुद्रुक ,हयातनगर,जवळा खुर्ददाभडी, महालिंगी, झुनझुनवाडी,भाटेगाव ,जमगव्हाण,सुकली वीर ,डोंगरखडा ,जवळ पांचाळ , वसफल
3)परभणी जिल्हा –
उखलद ,बाभळी ,पिंगळी ,शेंद्रा ,टाकळगव्हाण ,लोहगाव ,साजपूर ,आमदापूर,तांडपांगरी ,आंबेटाकळी ,पोखर्णी , देठना,इंडेवाडी,सालापुरी, सुरवाडी ,आहेरवाडी ,नावकी,कात्नेश्वर,पिंपळगाव बाळापूर ,सदलापूरशिरोरी ,डोबडी तांडा ,शिर्शीबुद्रुक ,कान्हेगाव ,सायखेडा ,शेलगाव हटकर ,नरवाडी,कोठाळा,डिघोळ ,धामोणी
4)बीड जिल्हा –
वरवंटी,पिंपळा धायगुडा, गिरवली आपटे , गिरवली बामणे ,गीता ,भारज,सायगाव ,नांदगाव
इंजेगाव ,कौठळी ,तळेगाव ,डाबी,कन्हेरवाडी ,भोपळा
5)लातूर जिल्हा –
गांजूर , रामेश्वर ,दिंडेगाव ,कासार जवळा , ढोकी , काटगाव,मांजरी ,चिंचोलीबु ,गातेगाव , मुरुड अकोला ,चाटा,भोयरा,बोपला, चांडगाव, माटेगाव,भोकरंबा,डी.देशमुख ,कवठा कैज , नाहोली ,भेट ,अंधोरा
6)धाराशिव जिल्हा –
खट्टेवाडी ,नितलि ,घुगी ,लासोना,सांगवी ,कामेगाव,चिखली ,महालिंगी ,बरमगाव,मेडसिंगा,देवळाली , शेकापूर ,गवसूद ,वरवंटी ,पोहनेर , बेगडा,सुर्डी
पश्चिम महाराष्ट्र –
1)कोल्हापूर जिल्हा –
मदुर,अदमापूर ,व्हाणगुत्ती ,वाघापूर ,मडिलगे बुद्रुक ,कुर,मडिलगे खु , नीपण ,दारवाड , म्हसवे ,गारगोटी ,आकुर्डे ,पुष्पानगर,सोनारवाडी ,कराडवाडी ,शेळोली ,पडखंबे ,वेंगुर्ल, सोनुर्ली , नवले , देवर्डे, कारिवडे , सांगवडेवाडी ,सांगवडे, हालासवडे ,नेर्ली ,विकासवाडी ,कणेरीवाडी , कणेरी ,वडगाव ,कोगील बु, कोथळी,दाणोली , निमशिरगाव ,चिपरी , तारदाळ,हातकणंगले, तिळवणी,साजणी ,माणगाव ,पटतं कोडोली , दाभीळ , शेलॅप ,परपोली ,आंबाडे ,सुळेरान , कागल ग्रामीण , सिध्दनेर्ली ,व्हान्नूर,एकोंडी , बामणी ,खेबवडे ,व्हनाळी ,केव्हडें ,सावर्डे खु ,सावर्डे बु ,सोनाळी,कुरणी, निधोरी
2) सोलापूर जिल्हा-
घटणे,पोखरापूर,कलमन, राई,मालेगाव , जवळगा, मसले चौधरी,हत्तीज ,चिंचखोपण, शेलगाव, गौडगाव , मोहोळ ,पडसाळी, मेथवडे , संगेवाडी ,मांजरी ,देवकत्तेवाडी ,अनवली,कासेगाव ,चिन्चोली ,बामणी ,खुणेश्वर ,भोयरे ,हिंगणी निपाणि , आढेगाव ,सौंदाणे ,टाकली सिकंदर, कोंबडवाडी ,पाचेगाव,पुळूज ,फुल चिंचोली , विटे , पोहरगाव ,आंबे ,रांझणी, शेटफळ , एखतपूर,कमलापूर ,अजनाळे ,चिणके ,वझरे, नाझरे ,चोपडी ,कोले ,
3)सांगली जिल्हा
घटनांद्रे ,तिसंगी , शेटफळे , कवलापूर ,बुधगाव , माधवनगर ,कर्नाळ,पदमाळे , डोंगर सोनी , सिद्धेवाडी ,सावळज , मणेराजुरी ,सावर्डे , मत्कुणकी ,नागाव कवठे ,अंजनी , वज्र चोंदे, गव्हाण , सांगलवाडी
कोकण-
सिंधदुर्ग जिल्हा –उदेली, फणसवडे,आंबोली ,गेलेले ,घारप,तांबूली, बांदा,डेगवे.
गोवा-उत्तर गोवा जिल्हा –पत्रादवी




