LIC विमा सखी योजना 2026: महिलांना दरमहा ₹7000 स्टायपेंड आणि सरकारी नोकरीची ‘गोल्डन चान्स’! असा करा अर्ज आणि व्हा आत्मनिर्भर!

नमस्कार मित्रांनो! महिलांनो, तुम्ही देखील दहावी पास असाल आणि घरबसल्या किंवा तुमच्या गावामध्ये सन्मानाने पैसे कमावण्याची तुमची इच्छा असेल, तर भारत सरकारने तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे! भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणासाठी ‘LIC विमा सखी योजना 2026’ सुरू करण्यात आली आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी डिझाइन केली आहे. 2026 च्या नवीन वर्षामध्ये या योजनेत काही महत्त्वाचे बदल आणि अपडेट्स देखील करण्यात आले आहेत. हेच अपडेट्स, विमा सखी योजना म्हणजे काय, या योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे आणि यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग, या महत्त्वाच्या संधीबद्दल अधिक माहिती घेऊया!

LIC विमा सखी योजना म्हणजे काय?

मित्रांनो, LIC विमा सखी योजना ही प्रामुख्याने महिलांना Insurance Agent म्हणून प्रशिक्षित करण्याकरिता सुरू केलेली Stipendiary योजना आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, LIC मार्फत तुम्हाला विमा विक्रीचे काम शिकवण्यासाठी पहिल्या तीन वर्षांपर्यंत दर महिन्याला ठराविक पगार (मानधन) मिळेल आणि यासोबतच तुम्ही केलेल्या कामावर तुम्हाला भरघोस कमिशन सुद्धा मिळेल. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि गावागावांमध्ये विम्याचा प्रसार करणे हा आहे. यामुळे महिलांना केवळ उत्पन्नाचे साधनच मिळणार नाही, तर समाजातील इतर लोकांना विम्याचे महत्त्व पटवून देऊन त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्यासही त्या मदत करतील.

योजनेसाठी आवश्यक पात्रता

या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. खाली दिलेल्या मुद्द्यांनुसार तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता:
  • या योजनेसाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अर्जदार महिलेचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • महिला उमेदवार किमान दहावी पास असणे अनिवार्य आहे. जर महिला उमेदवार उच्चशिक्षित असेल, तर तिला अधिक प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना किंवा स्वयंसहाय्यता गटातील (Self Help Group) महिलांना अधिक प्राधान्य दिले जाईल.
  • जर तुमच्या कुटुंबातील कोणीही, म्हणजेच पती, मुले, आई-वडील, सासू-सासरे आधीच LIC मध्ये कर्मचारी किंवा एजंट असतील, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विमा सखी योजनेचे फायदे

या योजनेअंतर्गत महिलांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात, जे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मदत करतात.
  • या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत Professional Training दिले जाते, जेणेकरून तुम्ही उत्तम विमा सल्लागार बनू शकाल.
  • जर तुम्ही पाच वर्ष यशस्वीरित्या काम केले, तर पदवीधर महिलांना LIC मध्ये Development Officer पदाच्या परीक्षेमध्ये आरक्षण किंवा विशेष संधी देखील मिळू शकते.
  • विमा सखी योजनेमध्ये तुम्हाला तीन वर्षांपर्यंत खालीलप्रमाणे स्टायपेंड (मानधन) देखील दिले जाते:
वर्ष दरमहा मानधन
पहिले वर्ष ₹7,000 हजार
दुसरे वर्ष ₹6,000 हजार
तिसरे वर्ष ₹5,000 हजार
टीप: महिलांनो, हे मानधन मिळवण्याकरिता तुम्हाला एलआयसीमार्फत मिळणारे छोटे-छोटे टार्गेट पूर्ण करावे लागतात. याशिवाय, तुम्ही जो विमा काढाल त्यावर तुम्हाला भरघोस वेगवेगळे कमिशन मिळते, जे तुमच्या कामावर आणि प्रयत्नांवर अवलंबून असते.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (आणि उच्च शिक्षणाचे प्रमाणपत्र असल्यास ते देखील)
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक / कॅन्सल चेक (बँक खात्याच्या तपशिलासाठी)
  • २ पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला)

LIC विमा सखी योजनेचा अर्ज कसा करावा?

महिलांनो, LIC विमा सखी योजनेचा अर्ज तुम्ही दोन पद्धतीने करू शकता: पहिली म्हणजे Online पद्धत आणि दुसरी म्हणजे Offline पद्धत. या दोन्हीही पद्धती मी खाली दिलेल्या स्टेप्समध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित रित्या समजून सांगितल्या आहेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • Step 1: LIC च्या अधिकृत वेबसाइटवर (licindia.in) जा.
  • Step 2: होमपेजवर खाली स्क्रोल करा आणि ‘Click for Bima Sakhi’ किंवा ‘Agency Career’ पर्यायावर क्लिक करा.
  • Step 3: तेथे ‘Registration for Bima Sakhi’ हा फॉर्म उघडेल.
  • Step 4: तुमचे नाव, पत्ता, शिक्षण आणि मोबाईल नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.
  • Step 5: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • Step 6: फॉर्म सबमिट करा. त्यानंतर LIC चे अधिकारी (Development Officer) तुम्हाला संपर्क करतील आणि पुढील प्रक्रिया समजावून सांगतील.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • तुमच्या जवळच्या LIC शाखेत (Branch Office) जा.
  • तेथील ‘विकास अधिकारी’ (Development Officer) किंवा ‘शाखा व्यवस्थापक’ (Branch Manager) यांची भेट घ्या.
  • त्यांना ‘विमा सखी’ योजनेत सहभागी व्हायचे असल्याचे सांगा.
  • ते तुम्हाला एक अर्ज फॉर्म देतील, तो व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा.

मदत आणि संपर्क तपशील

जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील, तर तुम्ही खालील संपर्क तपशिलांचा वापर करू शकता: महिलांनो, LIC विमा सखी योजना 2026 ही केवळ एक आर्थिक योजना नसून, ती तुम्हाला सन्मानाने जगण्यासाठी मिळालेली एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही शिकलेल्या असाल आणि तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडत असेल, तर या योजनेसाठी नक्कीच अर्ज करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हा. ही तुमच्यासाठी एक ‘गोल्डन चान्स’ ठरू शकते!

Leave a Comment