मित्रांनो, तुमच्या वाहनावरील Traffic e-Challan तपासणं आणि भरणं आता अगदी सोपं आहे. खालील स्टेप्स फॉलो करा आणि दंडाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.
ई-चालान ऑनलाइन कसे तपासाल?
- अधिकृत वेबसाइट https://echallan.parivahan.gov.in/ वर जा.
- वाहन क्रमांक, चालान क्रमांक किंवा Driving License Number टाका.
- मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी करा.
- स्क्रीनवर Challan Status दिसेल, ज्यात नियमभंगाचा प्रकार आणि दंडाची रक्कम नमूद असेल.
ई-चालान ऑनलाइन कसे भराल?
- Parivahan Portal वर वाहन क्रमांक किंवा चालान क्रमांक टाकून “Get Details” वर क्लिक करा.
- चालानची माहिती तपासा.
- “Pay Now” पर्याय निवडा.
- Debit Card, Credit Card, Net Banking किंवा UPI द्वारे पेमेंट करा.
- पेमेंट पूर्ण झाल्यावर डिजिटल रिसीट डाउनलोड करा आणि सुरक्षित ठेवा.
वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे
- वैध Driving License
- RC Book (वाहन नोंदणी प्रमाणपत्र)
- वैध Insurance पॉलिसी
- PUC Certificate (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र)
दंड न भरल्यास परिणाम
- Driving License निलंबित होऊ शकतं.
- कोर्टात हजर व्हावं लागू शकतं.
- Vehicle Insurance क्लेम नाकारला जाऊ शकतो.
- जास्त दंड भरावा लागू शकतो.
मित्रांनो, Parivahan Portal चा वापर करून दंड तपासा आणि वेळेत भरा. सुरक्षित वाहन चालवा, नियम पाळा!




