मित्रांनो, शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी! पीएम किसान योजना अर्थात PM Kisan Yojana अंतर्गत २१वा हप्ता लवकरच येत आहे. केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली आहे की हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. गेल्या काही महिन्यांपासून या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांचा इंतजार आता संपला आहे.
२०वा हप्ता कधी आला होता?
मागील वर्षी २ ऑगस्ट २०२५ रोजी २०वा हप्ता वितरित झाला होता. त्यावेळी जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळाले होते. पण आता २१व्या हप्त्याबाबत big update आला आहे, हा हफ्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जमा होणार. सरकारने सांगितले की, काही शेतकऱ्यांना यावेळी २ हजाराऐवजी थेट ४ हजार रुपये खात्यात येतील.
का मिळणार ४ हजार रुपये?
मित्रांनो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. २०वा हप्ता वेळेत न मिळालेल्या शेतकऱ्यांना ती रक्कम आता २१व्या हप्त्यासोबत मिळेल. म्हणजे:
- २०वा हप्ता थकला असेल तर २ हजार
- २१वा हप्ता २ हजार
- एकत्र ४ हजार रुपये!
पण हे फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांची e-KYC किंवा जमिनीची नोंद पूर्ण झाली नाही किंवा काही तांत्रिक कारणामुळे २०वा हप्ता अडकला होता. म्हणूनच सरकारने सर्व राज्यांना आधार-आधारित e-KYC आणि जमीन रेकॉर्ड तपासणी पूर्ण करण्यास सांगितलं आहे.
२१वा हप्ता कधी येईल?
सरकारच्या अधिकृत X handle वरून ही माहिती देण्यात आली आहे. १४ नोव्हेंबरला ही घोषणा झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना फक्त काही दिवस थांबावं लागेल. दिवाळीआधी किंवा बिहार निवडणुकीआधी येईल अशी अपेक्षा होती, पण आता निश्चित तारीख आली आहे – १९ नोव्हेंबर २०२५.
स्टेटस कसा तपासायचा?
तुम्हाला तुमची PM Kisan status तपासायची असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा:
- अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- “Beneficiary Status” वर क्लिक करा.
- आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
- “Get Data” वर क्लिक करा.
- तुमची स्थिती आणि पेमेंट स्टेटस दिसेल.
e-KYC कशी करायची?
जर तुमची e-KYC पूर्ण नसेल तर लगेच करा. त्यासाठी:
- वेबसाइटवर “e-KYC” पर्याय निवडा.
- OTP द्वारे आधार व्हेरिफिकेशन करा.
- किंवा जवळच्या CSC सेंटरला भेट द्या.
मित्रांनो, फसवणुकीपासून सावध राहा. PM Kisan Yojana च्या नावाने येणाऱ्या APK फाइल्स किंवा लिंक्सवर क्लिक करू नका. फक्त अधिकृत वेबसाइटचा वापर करा.
कोण पात्र आहे?
- जमीनधारक शेतकरी कुटुंब
- वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी
- आयकर भरणारे शेतकरी अपात्र
शेतकरी बंधू, तुमची e-KYC आणि जमिनीची नोंद तपासून घ्या. १९ नोव्हेंबरला खात्यात पैसे येणार आहेत. ज्यांना २०वा हप्ता मिळाला नाही, त्यांना double benefit मिळेल. सरकारने फसव्या लाभार्थ्यांना हटवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत, त्यामुळे खरे शेतकरीच लाभ घेतील.
तुम्ही तुमची स्थिती तपासली का? कमेंटमध्ये सांगा! आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.




