Shauchalaya Yojana Maharashtra संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. सरकारचा हा उपक्रम स्वच्छ भारत अभियान आहे. या योजनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण शौचालय योजनेचा अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती तसेच शौचालय योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
मोफत शौचालय योजनेचे उद्देश
Free Toilet Yojana Purpose
गुगल पे देत आहे 2 लाख रुपये कर्ज, मोबाईलवरून करा अर्ज 👈
- या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण देशाला स्वच्छ बनविणे हा आहे.नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्यापासून थांबवणे.
- राज्यातील दारिद्र रेषेखालील जीवन जगत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या घरात स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल.राज्यातील नागरिकांचा सामाजिक विकास होईल.
- शौचालय बांधण्यासाठी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- शौचास उघड्यावर बसल्यानंतर दुर्गंधी तसेच रोगराई पसरते ही पसरून कोणीही आजारी पडू नये हा या योजनेचा उद्देश आहे
फ्री शौचालय योजनेची आवश्यक कागदपत्रे
Shauchalaya Yojana Documents
- आधार कार्ड
- उत्पन्न दाखला
- पत्त्याचा पुरावा
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Free Toilet Yojana Online Process
लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाहीतर दुप्पट हफ्ता मिळणार 👈
- फ्री शौचालय योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- अर्जदाराला रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, राज्य, कॅपच्या कोड टाकावा लागेल.
- त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करा.
- लॉगिन झाल्यानंतर तुमचा जुना पासवर्ड बदलण्यासाठी चे ऑप्शन मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड टाकावा लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये न्यू एप्लीकेशन हा पर्याय असेलया पर्यायावर क्लिक करतात तुमच्यासमोर फ्री शौचालय योजनेचा अर्ज उघडेल.
- त्यानंतर तुम्हाला या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल जसे की वैयक्तिक माहिती, पत्ता, बँक खात्याची संपूर्ण माहिती याबद्दल ची संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल.
- त्यानंतर अप्लाय या बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही फ्री शौचालय योजनेचा अर्ज पूर्ण करू शकता.




