मतदान कार्ड डाउनलोड ऑनलाईन (2 मिनिटात) | Voter Card Download

मित्रांनो, अनेकदा आपलं Voter Card हरवतं, फाटतं किंवा घरी सापडत नाही, अशावेळी आपण खूप त्रस्त होतो. आधीच्या काळात नवीन Voter ID मिळवण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागायच्या, अर्ज भरावा लागायचा आणि बराच वेळ वाया जायचा. पण आता काळ बदललाय आणि ही सुविधा सरकारने पूर्णपणे Online उपलब्ध करून दिली आहे.

आता फक्त काही मिनिटांत तुम्ही तुमच्या मोबाईलवरून थेट नवीन Voter ID Card Download करू शकता. हा डिजिटल कार्ड PDF स्वरूपात उपलब्ध होतो, तो तुम्ही फोनमध्ये सेव करू शकता आणि त्याचा प्रिंट काढून कुठल्याही सरकारी किंवा खासगी कामासाठी वापरू शकता.

हा कार्ड मूळ ओळखपत्राइतकाच अधिकृत मानला जातो.या लेखात आपण अगदी सोप्या पद्धतीने, स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की घरबसल्या फक्त मोबाईलच्या मदतीने Voter App वापरून Voter ID कसा Download करायचा. यात कुणाकडे जाण्याची, एजंटला पैसे देण्याची किंवा वेळ वाया घालवण्याची अजिबात गरज नाही.

Voter Helpline App ने अजून सोपं

जर तुम्ही mobile app वापरता, तर Voter Helpline हा Election Commission चाच अॅप आहे. तो खूपच उपयुक्त आहे.

  • Google Play Store किंवा App Store वर जा.
  • Voter Helpline” सर्च करा आणि डाउनलोड करा.
  • अॅप उघडून Download e-EPIC पर्याय निवडा.
  • EPIC number किंवा mobile number ने लॉगिन.
  • OTP verify करा.डाउनलोड बटण दाबा.

या अॅपमध्ये आणखीही फायदे आहेत – electoral roll search, polling station शोधणे, form submit करणे, तक्रार नोंदवणे. एकदम all-in-one टूल.

EPIC नंबर हरवला असेल तर?

काळजी करू नका. अनेकजणांना हा प्रश्न पडतो.

  1. त्याच https://voters.eci.gov.in/ वर जा.
  2. Search by details किंवा Electoral Search पर्याय निवडा.
  3. तुमचं पूर्ण नाव, वडिलांचं/पतीचं नाव, जन्मतारीख, राज्य, जिल्हा टाका.
  4. सर्च केल्यावर तुमचा EPIC number आणि नाव दिसेल.
  5. त्यानंतर वर सांगितलेल्या स्टेप्स करून डाउनलोड करा.

कधी कधी साइट जरा हळू चालते, विशेषतः निवडणुकीच्या काळात. त्यामुळे सकाळी लवकर किंवा दुपारी २-३ च्या दरम्यान ट्राय करा.

Leave a Comment